S M L

'प्लँचेट' सिद्ध करून दाखवा, 'अंनिस'चं भटकरांना आव्हान

Sachin Salve | Updated On: Aug 2, 2014 02:42 PM IST

'प्लँचेट' सिद्ध करून दाखवा, 'अंनिस'चं भटकरांना आव्हान

02 ऑगस्ट : डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासात पुणे पोलिसांकडून 'प्लँचेट'चा वापर केल्याची घटना उजेडात आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पण याप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञ विजय भटकर यांनी प्लँचेटमार्फत खुनाचा तपास शक्य आहे असं वक्तव्य केलं होतं.

त्यांच्या वक्तव्यामुळे अंनिसनं विजय भटकर यांना प्लँचेट करून आत्मा बोलवण्याचं आणि त्यामार्फत खुनाचा तपास लावणं शक्य असल्याचं सिद्ध करावं असं आव्हान दिलंय.

महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपली ही भूमिका जाहीर केलीय. दाभोलकर यांनी आयुष्यभर अंधश्रद्धेच्या विरोधात लढा दिला पण त्यांच्या खूनाचा तपासासाठी पुण्याचे माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ आणि त्यांचे सहकारी कॉन्सटेबल मनीष ठाकूर यांनी प्लँचेटचा वापर केल्याचं आऊटलूक मासिकाने उघड केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 2, 2014 02:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close