S M L

माळीण गाव दुर्घटनेत मृतांचा आकडा 129 वर

Samruddha Bhambure | Updated On: Aug 4, 2014 05:57 PM IST

माळीण गाव दुर्घटनेत मृतांचा आकडा 129 वर

1augest_malin_pune (9)04 ऑगस्ट : पुण्याजवळ आंबेगाव तालुक्यातल्या माळीण गावातील दुर्घटनेतल्या मृतांची संख्या आता 129 वर पोहचली आहे. माळीण गावावर डोंगरकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेला 6 दिवस झाले आहेत. सकाळी बचाव कार्य पावसामुळे अर्धा तास थांबवण्यात आलं होत मात्र आता वेगाने सुरु आहे.

44 घरं या ढिगार्‍याखाली गाडली गेली होती. काल पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने बचावकार्य जोरात सुरू होतं पण आज पावसाने पुन्हा जोर धरला आहे. ढिगारा उपसण्याचं काम अजूनही सुरू असल्यानं मृतांचा आकडा वाढतोय. या दुर्घटनेत अनेकांनी आपल्या नातेवाईकांना गमावले आहेत. माळीणमध्ये अधूनमधून पाऊस पडत असल्याने आणि चिखल झाल्याने एनडीआरएफच्या जवानांना बचावकार्यासाठी झुंजावं लागतंय आणि त्यातच भयानक दुर्गंधीमुळे एनडीआरएफच्या जवानांना अडथळा येतोय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 4, 2014 01:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close