S M L

मतांसाठी 'आरक्षण', राष्ट्रवादीचा धनगरांना पाठिंबा

Sachin Salve | Updated On: Aug 16, 2014 04:52 PM IST

मतांसाठी 'आरक्षण', राष्ट्रवादीचा धनगरांना पाठिंबा

16 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पेटलाय. काँग्रेसने धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात सामिल करुन घेण्यास नकार देत आरक्षणासाठी तिसरी सूची तयार करण्याची तयारी दर्शवली आहे. पण यामुळे राष्ट्रवादीची कोंडी झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होते. अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचं पवारांनी जाहीर केलं. त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

त्यावेळेस धनगड आणि धनगर एकच असल्याची भूमिका त्यांनी मांडली. तिसर्‍या सूचीला राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही, ती भूमिका राज्य सरकारची आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता धनगरांना आरक्षण द्यावं असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आदिवासींना ज्या गोष्टी मिळतात त्या सर्व गोष्टी धनगर समाजाला मिळायला हव्यात अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे, असं ते म्हणाले. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या बारामतीतच धनगर आंदोलन पेटल्यामुळे राष्ट्रवादीने काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर पवारांनी धनगर समाजाला पाठिंबा जाहीर करुन 'मतपेटी' सुरक्षित करण्याचा प्रयत्न केलाय.

144 जागांची मागणी ही तर कार्यकर्त्यांची -पवार

जागावाटपाच्या मुद्यावरही पवारांनी युटर्न घेतलाय. 144 जागांची मागणी ही कार्यकर्त्यांची आहे.ती आम्ही टाकून दिलेली नाही. व्यापक हितासाठी आम्ही तडजोडीचा मार्ग स्वीकारू असं सांगत पवारांनी एकपाऊल मागे घेत स्वबळाची भाषा मोडीत काढली आहे. जिथे ज्यांचे तगडे उमेदवारी तिथे तिकेट अशी भूमिकाही पवारांनी मांडली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 16, 2014 01:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close