S M L

पुणे मेट्रोसाठी केंद्राकडून भेदभाव -मुख्यमंत्री

Sachin Salve | Updated On: Aug 18, 2014 10:38 PM IST

7568cm_on_voting_list18 ऑगस्ट : मेट्रो सुरू करण्यावरून आता चांगलंच राजकारण सुरू झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपूरच्या मेट्रो प्रकल्पाचे येत्या 21 ऑगस्ट रोजी भूमिपूजन होणार आहे. पण या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून मदत मिळण्याचीही शक्यता आहे. यावरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे.

नागपूरला मदत करणारे केंद्र सरकार पुणे मेट्रोसाठी भेदभाव करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केलाय. मेट्रोवरून केंद्र राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

तर मुख्यमंत्र्यांनी पुणे मेट्रोसाठी पाठपुरावाच केला नाही. पुणे मेट्रोचा प्रस्तावही अपूर्ण आहे. असं प्रत्युत्तर नितीन गडकरींनी मुख्यमंत्र्यांना दिलंय.

विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी जेनपीटी, सोलापूरमध्ये विकासकामांचं उद्घाटन मोदींच्या हस्ते पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री आणि मोदींमध्ये जुगलबंदी रंगली होती. त्यावरुन पुन्हा एकदा मुख्यमत्र्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 18, 2014 09:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close