S M L

आरटीओ बंद होणार, नितीन गडकरींचे संकेत

Samruddha Bhambure | Updated On: Aug 19, 2014 05:28 PM IST

आरटीओ बंद होणार, नितीन गडकरींचे संकेत

044513nitin_gadkari

19 ऑगस्ट :  केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतूक प्रणालीत महत्त्वाचे बदल करण्याचे संकेत दिलेत. 'प्रादेशिक वाहतूक कार्यालये अर्थात, आरटीओ, हे कालबाह्य झालं आहे त्यामुळे आरटीओला बंद करण्याची वेळ आली आहे. आरटीओ ऐवजी दुसरी प्रभावी सिस्टीम सुरू करण्यात येईल', असे संकेत नितीन गडकरी यांनी दिले आहेत. ते पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलत होते. आरटीओमध्ये फक्त लक्ष्मीदर्शनाचा खेळ चालतो, अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान, एकीकडे शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे लक्ष्मीचे पुजन करायचे हे धोरण राज्यात सुरू असल्याची जळजळीत टीका सार्वजनिक बांधकाम आणि सिंचन खात्याला उद्देशून त्यांनी केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 19, 2014 01:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close