S M L

'दाभोलकरांच्या खुनाबद्दल एकाही खासदाराने प्रश्न विचारला नाही'

Sachin Salve | Updated On: Aug 19, 2014 09:11 PM IST

hamid dabholkar19 ऑगस्ट : डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला 20 ऑगस्टला म्हणजे उद्या (बुधवारी) एक वर्ष पूर्ण होतंय. वर्षभरानंतरही डॉक्टर दाभोलकरांच्या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही.

डॉ दाभोलकरांच्या हत्येचा शासनाला गांर्भिय नाही. एकाही आमदाराने किंवा खासदाराने अधिवेशनात डॉक्टरांच्या खुनाबाबत एकही प्रश्न विचारला नाही, त्यामुळे सत्य बाहेर येऊ नये, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत का असा प्रश्न पडतो, अशी वेदना हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केलीय.

दाभोलकरांच्या पहिल्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन समिती उद्या सरकारचा निषेध करणार आहे. 20 ऑगस्टला अंनिस राज्यात आणि देशात रिंगण नाटकाच्या माध्यमातून हे निषेध आंदोलन करणार आहे.

यासाठी अंनिस तर्फ 20 पथनाट्य रचण्यात आली आहेत. 20 ऑगस्टच्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते नसरूद्दीन शहा देखील हजर राहणार आहेत. अशी माहिती अंनिसच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 19, 2014 09:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close