S M L

नरेंद्र मोदीच ठरवणार मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार-तावडे

Sachin Salve | Updated On: Aug 23, 2014 10:07 PM IST

नरेंद्र मोदीच ठरवणार मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार-तावडे

vinoad tawade23 ऑगस्ट : निवडणुका जशा जवळ येतायेत तसं भाजप आणखी आक्रमक होताना दिसतंय. महाराष्ट्रात महायुतीकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण होणार हे नरेंद्र मोदीच ठरवतील, असं भाजप नेते विनोद तावडेंनी स्पष्ट केलंय. आयबीएन-लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत विनोद तावडेंनी पक्षाची भूमिका जाहीर केली.

महायुतीत घटकपक्षांची संख्या जास्त असल्याकारणामुळे जागावाटपाला उशीर झाला अशी कबुल् देत येत्या 1 सप्टेंबरला महायुतीतलं जागावाटप जाहीर करू असंही तावडे यांनी सांगितलं.

तसंच ज्या जागांवर भाजप जिंकू शकत नाही, तिथे आघाडीच्या बड्या नेत्यांना गाळणी लावून प्रवेश देणार, असंही तावडे म्हणाले. 26 सप्टेंबरनंतर आघाडीच्या बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

त्याचबरोबर महायुतीत मुख्यमंत्रीपदाची शर्यत नाही. शिवसेना आणि भाजप जवळपास सारख्याच जागेवर लढणार आहे. त्यामुळे संख्याबळावर मुख्यमंत्री ठरेल. मुळात प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा असते त्यामुळे शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंचं नाव पुढे केलं तर आमच्याकडून काही कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे केलं पण ही फक्त कार्यकर्त्यांची इच्छा आहे. नरेंद्र मोदींचं मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असणार हे ठरवतील असं तावडेंनी स्पष्ट केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 23, 2014 10:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close