S M L

बेपत्ता झालेल्या ओम बनकरची हत्या

Sachin Salve | Updated On: Aug 30, 2014 09:09 PM IST

बेपत्ता झालेल्या ओम बनकरची हत्या

om bankar pune muder30 ऑगस्ट : पूर्ववैमन्यसातून एका 20 वर्षाच्या तरुणाने 9 वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक कृत्य करून हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडलीये. हडपसर इथं राहणारा ओम बनकर हा 9 वर्षाच्या मुलगा तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. आज त्याचा मृतदेह कोंढव्याच्या बोपदेव घाटात सापडला त्यानंतर पोलिसांच्या तपासाअंती हा धक्कादायक प्रकार समोर आला. ओमचा खून त्याच्याच शेजार्‍यांने केल्याचं उघड झालंय. या प्रकरणी आरोपी ऋषभ काळाणे (20) आणि त्यांच्या आई-वडिलांना अटक करण्यात आलीये.

पुण्यात हडपसर इथं राहणारा ओम बनकर 27 ऑगस्ट रोजी शाळेतून घरी परतल्यानंतर बेपत्ता झाला होता. घराचा दरवाजा उघडा होता, टीव्ही सुरू होता मात्र ओम घरात नव्हता. ओमचा शोधाशोध घेतला पण तो काही सापडला नाही. त्यामुळे ओमच्या आई-वडिलांनी हडपसर पोलीस स्टेशन गाठून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. मात्र आज तीन दिवसांनंतर ओमचा मृतदेह कोंढव्याच्या बोपदेव घाटात सापडला.

ओमचा मृतदेह सापडल्यानंतर तपासाची सूत्रं फिरली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओम ज्या अपार्टमेंटमध्ये राहत होता त्याच अपार्टमेंटमध्ये राहणारा ऋषभ काळाणे (20) याच्यासोबत त्याचं काहीदिवसांपूर्वी भांडण झालं होतं. तसंच अपार्टमेंटमध्ये पार्किंगच्या मुद्यावरुन दोन्ही शेजार्‍यांमध्ये वादही झाला होता. ज्या दिवशी ओम बेपत्ता झाला त्या दिवशी ऋषभने टीव्ही बंद पडल्याच्या बहाण्याने घरी बोलावले आणि त्यांच्यावर अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. ओमने त्याला विरोध केला त्यामुळे संतापलेल्या ऋषभने त्याचा गळा दाबून खून केला. ऋषभ एवढ्यावर थांबला नाही. ओमचा मृत्यू झाला की नाही हे पाहण्यासाठी त्याचा मृतदेह पाण्याच्या टबमध्ये बुडवून खात्री केली. ऋषभचे आई-वडिल घरी आल्यानंतर घडलेला प्रकार त्याने सांगितला. घडलेल्या प्रकारानंतर त्याच्या आई-वडिलांनी ओमचा मृतदेह एक दिवस आपल्याच घरात ठेवला. आणि दुसर्‍या दिवशी ओमचा मृतदेह पोत्यात टाकून कोंढव्याच्या बोपदेव घाटात फेकून दिला.

ऋषभच्या आईने ओमचा मृतदेह घरात लपवून ठेवला तर ऋषभ आणि त्याच्या वडिलाने मृतदेह बोपदेव घाटात फेकून दिला. या प्रकरणी आरोपी ऋषभला अटक करण्यात आली आहे तर या प्रकरणात मदत करण्याच्या आरोपावरुन ऋषभच्या आई-वडिलांना ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी दिली. ओमवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 30, 2014 07:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close