S M L

उद्यापासून लागू शकते आचारसंहिता -अजित पवार

Sachin Salve | Updated On: Sep 8, 2014 03:44 PM IST

nasik_ajit_pawar08 सप्टेंबर : उद्या 9 सप्टेंबर रोजी निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकता आणि उद्यापासून आचारसंहिता लागू शकते असे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिले. तसंच 15 ते 17 ऑक्टोबर या काळात होऊ मतदान शकतं असंही अजित पवार पवार म्हणाले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

विधानसभा निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र गणेशोत्सव आणि निवडणुकीच्या पूर्व तयारीचा आढावा न झाल्यामुळे तारखा पुढे ढकलण्यात आल्यात. दिवाळी आणि सणवार लक्षात घेता लवकरात लवकर निवडणुकींच्या तारखा जाहीर कराव्यात अशी मागणी राजकीय पक्षांनी केलीये. तारखांना उशीर होत असल्याचं लक्षात घेता काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीनेही प्रचाराचा नारळ फोडला. आता अजित पवार यांनी उद्याच निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकता असा अंदाज व्यक्त केला. तसंच 15 ते 17 ऑक्टोबर या काळात होऊ मतदान शकतं असंही अजित पवार पवार म्हणाले. यावेळी पत्रकारांनी जागावाटपाबद्दल विचारले असता जागावाटपाबाबतचा निर्णय वरिष्ठच घेतील, असं सावध उत्तर अजित पवारांनी दिलं. त्यामुळे गणरायांच्या विसर्जनानंतर निवडणुकीची धामधूम पाहण्यास मिळणार हे मात्र नक्की.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 8, 2014 03:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close