S M L

संतोष मानेची फाशीची शिक्षा हायकोर्टातही कायम

Samruddha Bhambure | Updated On: Sep 9, 2014 02:14 PM IST

संतोष मानेची फाशीची शिक्षा हायकोर्टातही कायम

09 सप्टेंबर :  पुण्यात बेदरकारपणे एसटी बस चालवून नऊ जणांचा बळी घेतल्याप्रकरणी संतोष माने याची फाशीची शिक्षा मुंबई हायकोर्टाने कायम ठेवली आहे. 2011 मध्ये पुण्याच्या स्वारगेट बस डेपोतून बेदरकारपणे बस चालवून संतोष मानेने 9 जणांचा बळी घेतला होता. सेशन्स कोर्टाने संतोष मानेला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती पण तो मनोरूग्ण असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला होता. माने याची फाशीची शिक्षा कायम ठेवायची की तिचे जन्मठेपेत रुपांतर करावे याबाबतच्या गेले काही दिवस युक्तिवाद सुरू होता. आज हायकोर्टाने त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 9, 2014 02:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close