S M L

निवडणुकीनंतरच्या आघाडीचा आताच विचार नाही - शरद पवार

Samruddha Bhambure | Updated On: Oct 3, 2014 02:26 PM IST

sharad pawar 15th

03 सप्टेंबर :   निवडणुकीनंतरच्या आघाडीचा आताच विचार करत नाही, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. पुण्यातील पत्रकार परिदषदेदरम्यान बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली. आमचं लक्ष स्थिर सरकार देण्याचं आहे असं ते म्हणाले, विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्याबाबत सोनिया गांधींनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. निवडणुकीबाबत राज्य पातळीवर निर्णय घेण्यात यावा असे त्या बैठकीत ठरले होते. मात्र त्यानंतरही ही आघाडी तुटली असे पवार म्हणाले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरुद्ध कराड दक्षिण मतदारसंघात उमेदवार देऊ नये, अशीच माझी इच्छा होती. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विलासराव उंडाळकर यांना पाठिंबा देण्यासंदर्भातला निर्णय स्थानिक नेत्यांनी घ्यावा, असं आम्ही ठरविले आहे. मुख्यमंत्र्यांना मी काही सांगू शकत नाही पण आमच्या सहकार्‍यांना सांगेन की व्यक्तिगत टीका टाळावी, असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.

सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादीवर होणार्‍या आरोपांचाही त्यांनी समाचार घेतला. सिंचन घोटाळा हे प्रचारासाठी माजवलेलं स्तोम आहे. धरणं उभी राहिली ती कुठून उभी राहिली मग? सगळ्या प्रकल्पांचा विलंब लागला हे मान्य. पण बजेटच्या तरतुदींपेक्षा पाचपट क्षमता वाढवल्या आणि त्यामुळे किंमती वाढल्या आणि विलंब लागला असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच विदर्भ वेगळा करण्याचा निर्णय राजकीय नेत्यांनी नाही तर तिथल्या जनतेने करावा, असं म्हणत शरद पवारांनी महाराष्ट्र एकसंध राहावा, अशीच आपल्या पक्षाची भूमिका असल्याचं सांगितलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 3, 2014 02:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close