S M L

'बाळासाहेब म्हटलेच होते, कमळाबाईची नजर दुसर्‍या पक्षावर'

Sachin Salve | Updated On: Oct 5, 2014 02:15 AM IST

'बाळासाहेब म्हटलेच होते, कमळाबाईची नजर दुसर्‍या पक्षावर'

sharad pawar on yuti04 ऑक्टोबर : बाळासाहेब ठाकरे हे भाजपला भाजप न म्हणता कमळाबाई म्हणायचे. ही कमळाबाई राहते आमच्या पक्षात पण हीचं लक्ष दुसर्‍या पक्षाकडं असतं आणि त्यांचं वाक्य हे खरं ठरलं अशी आठवण करून देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी युतीच्या घटस्फोटावर चांगलंच तोंडसुख घेतलं. ते पुण्यात बोलत होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज (शनिवारी) पुण्यात बालेवाडीमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी सेना-भाजप महाफुटीवर चांगलीच टीका केली. शिवसेना भाजप युती तुटली ते होणारही होतं आणि एका दृष्टीने ते बरं ही झालं अशी टीका पवारांनी केलं.

पवार पुढे असंही म्हणाले की, मला चांगलं आठवतं बाळासाहेबांचं भाजपबद्दल ठाम मत होतं. ते आपल्या भाषणात नेहमी भाजपला भाजप न म्हणता कमळाबाई म्हणायचे. ही कमळाबाई राहते आमच्या पक्षात पण हीचं लक्ष दुसर्‍या पक्षाकडं असतं असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे असं मी म्हणत नाही अशा शब्दात शरद पवारांनी सेना भाजप फुटीबद्दल भाष्य केलं.

राज ठाकरे यांचीही त्यांनी खिल्ली उडवली. मी कोणावर वैयक्तिक टीका करत नाही, युती तोडल्यानंतर आपण आघाडी तोडली, असं म्हणणार्‍या राज यांचा मी आभारी आहे. कारण मी भाजप सेनेचंही धोरण ठरवतो, हे सिद्ध झालं.या निमित्ताने त्यांनी राष्ट्रवादीला प्रभावशाली तरी समजलं असा टोला पवारांनी लगावला. दरम्यान, या सभेत पाऊस आल्यानं लोकांना खुर्च्या डोक्यावर घ्याव्या लागल्या.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 4, 2014 11:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close