S M L

भाजप उमेदवाराच्या गाडीत सापडली 20 लाखांची रोकड

Sachin Salve | Updated On: Oct 9, 2014 05:22 PM IST

भाजप उमेदवाराच्या गाडीत सापडली 20 लाखांची रोकड

pune money cash09 ऑक्टोबर : एकीकडे प्रचाराची धामधूम सुरू आहे दुसरीकडे मतदाराजाला आकर्षित करण्यासाठी पैशाला पाय फुटले आहे. परभणी, धुळे पाठोपाठ पुण्यातही तब्बल 20 लाखांची रोकड सापडली आहे.

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने केलेल्या आणखीन एका कारवाईमध्ये पुणे जिल्ह्यात खेड टोल नाक्यावर 20 लाख 48 हजार 500 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

आंबेगावचे भाजप उमेदवार जयसिंग एरंडेंच्या प्रचाराच्या गाडीत ही रक्कम सापडली. ही गाडी जयसिंग एरंडेंच्या मुलाची आहे. भरारी पथकांने रक्कम आणि गाडी ताब्यात घेतली असून चौकशी सुरू आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 9, 2014 04:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close