S M L

उमेदवार विजयी होतील पण हजारांच्या फरकानेच -चव्हाण

Sachin Salve | Updated On: Oct 16, 2014 11:35 PM IST

chavan--621x41416 ऑक्टोबर : राज्यात पंचरंगी निवडणुकांमुळे चुरशीच्या लढती आहेत. लोकसभेच्या वेळी उमेदवार लाखाने निवडून आले आता तसं होणार नाही. काही हजारांनीच उमेदवार निवडून येतील असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात व्यक्त केलं. दक्षिण कराडमधे भाजप-सेनेकडे उमेदवाराच नाहीत. आपली खरी लढत काँग्रेस बंडखोर विलास उंडाळकरांसोबतच आहे अशी कबुलीही चव्हाणांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची कराडमध्ये सभा प्रचार समाप्ती दिवशी दुपारी 1 वाजता होणार होती म्हणून त्यांना उत्तर देण्याकरता आपण दुपारी 3 वाजता सभा ठेवली होती. पण मोदींची सभा झालीच नाही ती कशामुळे हे आपल्याला माहीत नाही असं सांगून प्रचार संपल्यावर आपण कार्यकर्त्यांसोबत फिरलो-गप्पा मारल्या असा टोला चव्हाणांनी लगावला.तसंच टीव्ही पेपर्स पाहिले नाहीत. त्यामुळे एक्झिट पोलच्या निष्कर्षाबाबत बोलणार नाही असंही चव्हाण म्हणाले. पुण्यात सुरू असलेल्या जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेला भेट देऊन चव्हाण यांनी खेळाचा आनंद लुटला. 'टेलिग्राफ'मध्ये आलेली मुलाखत ही अनवधनानं झालेली चूक आहे. मुलाखत झाल्यानंतर अनौपचारिक गप्पांमध्ये आपण जे बोललो ते रेकॉर्ड केलं गेलं आणि छापून आलं. त्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त केली आहे अशी पुस्तीही चव्हाण यांनी जोडली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 16, 2014 10:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close