S M L

पुण्यात शिवसेनेचे विभागप्रमुख राजू दशिलेंची गोळ्या झाडून हत्या

Sachin Salve | Updated On: Oct 18, 2014 11:41 PM IST

पुण्यात शिवसेनेचे विभागप्रमुख राजू दशिलेंची गोळ्या झाडून हत्या

18 ऑक्टोबर : मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना पुण्यात शिवसेनेचे विभागप्रमुख राजू दशिले यंाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

पुनवळे इथं दशिले यांच्या कार्यलयात घुसून अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्यात. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री 8.30 ते 8.45 च्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा खून राजकीय वैमन्यसातून नसून पूर्ववैमन्यसातून झालेला खून आहे.

दशिले यांच्यावर ज्या इसमाने गोळीबार केला तो कुख्यात गुन्हेगार सचिन कुदळे यानेच केलाय असा संशय दशिले यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलाय. मागील एक महिन्यापासून सचिन कुदळे हा फरार होता. गेल्या 25 वर्षांपासून राजू दशिले हे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक होते. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 18, 2014 11:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close