S M L

सुखोई विमानांच्या उड्डाणावर तात्पुरती बंदी

Sachin Salve | Updated On: Oct 22, 2014 04:43 PM IST

सुखोई विमानांच्या उड्डाणावर तात्पुरती बंदी

22 ऑक्टोबर : पुणे जिल्ह्यात वायुदलाच्या सुखोई विमानाला झालेल्या अपघातानंतर सुखोईच्या उड्डाणांवर तात्पुरती बंदी घालण्यात आलीय. पुण्यातल्या अपघातानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. सर्व विमानांचं सिक्युरिटी ऑडिट होणार आहे. हे ऑडिट होईपर्यंत सर्व उड्डाणांवर बंदी कायम राहणार आहे. 14 ऑक्टोबर पुणे जिल्ह्यातील येऊरजवळ भारतीय वायु दलाचे सुखोई विमान अपघातग्रस्त झाले होते. कोलवडी शिवारात हे विमान कोसळले. या अपघातात विमानाचा चक्काचूर झाला होता पण वैमानिकांनी वेळीच पॅराशुटच्या साहाय्याने उड्या मारल्या त्यामुळे ते सुखरूप बचावले. या अगोदरही मागील वर्षी डिसेंबर महिन्यात सुखोईचे विमान पुण्याजवळ वाघोली भागात कोसळले होते. त्यानंतर सुखोई विमान कोसळल्याची ही दुसरी घटना होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 22, 2014 03:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close