S M L

भाजपने शब्द पाळावा अन्यथा करार जाहीर करू -शेट्टी

Sachin Salve | Updated On: Oct 28, 2014 01:43 PM IST

भाजपने शब्द पाळावा अन्यथा करार जाहीर करू -शेट्टी

raju_shetty28 ऑक्टोबर :सत्तेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना कशा प्रकारे वाटा मिळावा यासंबंधीचा करार भाजपच्या कोअर कमिटीशी झालाय, असं संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलंय. या कराराचं भाजपनं पालन करावं जर असं झालं नाहीतर लिखित करार जाहीर करू असा इशाराच शेट्टी यांनी दिला. ते पुण्यात बोलत होते.

महायुती तुटली होती तेव्हा कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपच्या नेत्यांनी आम्हाला आश्वासनं दिली होती. विधानसभेच्या निवडणुकीत जरी आम्ही निवडून आलो नाहीत पण ग्रामीण भागात भाजपच्या विजयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोठ्या प्रमाणात हिस्सा आहे असा दावाही त्यांनी केला. आम्ही काही स्वत:हून हिस्सा मागत नाही. जो काही लिखित करार झालाय तो भाजपने पाळावा एवढीच अपेक्षा आहे पण जर असं झालं नाहीतर लिखित करार जाहीर करू असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.

काही प्रश्न ?

1. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भाजपमध्ये असा लिखित करार झालाय का?

2. लिखित करार जर झालेला असेल तर तो लोकांसमोर का आणत नाही?

3. या करारात नेमके कोणते मुद्दे आहेत?

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 28, 2014 01:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close