S M L

चोरडिया आत्महत्या प्रकरण : कोण आहे आशिष शर्मा?

Samruddha Bhambure | Updated On: Oct 30, 2014 04:07 PM IST

चोरडिया आत्महत्या प्रकरण : कोण आहे आशिष शर्मा?

30 ऑक्टोबर :  पुण्यातील उद्योगपती आणि पंचशील हॉटेल्स ग्रुपचे व्यवस्थापकीय अजय चोरडिया यांच्या आत्महत्येच्या विषयाला वेगळं वळण मिळाले असून, पोलीस आता आशिष शर्मा या व्यक्तीच्या शोधात आहेत.

अजय चोरडिया यांनी सोमवारी दुपारी चिंचवडमधील त्यांच्या मालकीच्या एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेली एक चिठ्ठी आता पोलिसांना मिळाली असून, या चिठ्ठीमध्ये आपल्या आत्महत्येला फक्त आशिष शर्मा ही कारणीभूत असल्याचे त्यांनी लिहिलेले आहे. मात्र, आशिष शर्मा नक्की कोण याचा कोणताही उल्लेख चिठ्ठीमध्ये नाही. त्यामुळे चोरडिया यांनी उल्लेख केलेले आशिष शर्मा नक्की कोण, हे अजून स्पष्ट झालेलं नसून पिंपरी-चिंचवडमधील पोलीस याचा शोध घेत आहेत. याशिवाय या चिठ्ठीमध्ये असणार हस्ताक्षर हे अजय चोरडिया याचेच आहे यासाठी पोलीस हस्ताक्षर तज्ञांची मदत घेत आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 30, 2014 04:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close