S M L

मृत्यूशी झुंज अपयशी, 'त्या' तरुणाचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Oct 31, 2014 11:13 PM IST

Pune debries31 ऑक्टोबर : पुण्याजवळील नर्‍हे आंबेगाव भागात सात मजली इमारत कोसळली. पहाटेपासून ढिगाराखाली दबलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू झालाय. या तरुणाने सर्वांचे जीव वाचवले मात्र तो आपला जीव वाचवून शकला नाही त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ढिगाराखाली आणखी एक तरुण अडकलेला असून त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे.

पुण्याजवळच्या नर्‍हे आंबेगाव भागात आज पहाटे एक सात मजल्यांची इमारत पत्याच्या बंगल्यासारखी कोसळली. इमारतीला तडे गेल्यामुळे ही इमारत कोसळली असल्याचं सांगितलं जात आहे. इमारत कोसळण्यापूर्वी मोठा आवाज झाला. त्यामुळे प्रसंगावधान राखत या इमारतीत आठ कुटुंबांनी बाहेर धाव घेतली. सर्व कुटुंबीय बाहेर आल्यानंतर काही मिनिटांतच संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली. पण दुर्देवाने या इमारतीत दोन तरुण अडकले गेले. घटनास्थळी सकाळपासून अग्निशमन दलाचे जवान या तरुणांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत पण संध्याकाळी या तरुणाचा मृत्यू झाला. तर ढिगाराखाली अडकलेल्या दुसर्‍या तरुणाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. विशेष म्हणजे ही इमारत फक्त एक वर्ष जुनी होती. या प्रकरणी बिल्डरला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 31, 2014 11:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close