S M L

पुण्यात रेल्वे स्टेशनवरची आग आटोक्यात

Sachin Salve | Updated On: Nov 1, 2014 09:37 PM IST

पुण्यात रेल्वे स्टेशनवरची आग आटोक्यात

pune_fire301 नोव्हेंबर : पुण्यातील रेल्वे स्टेशनस्टेशनवर आज (शनिवारी) संध्याकाळी सैन्याच्या कार्यालयाला आग लागली होती. तीन तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आता आटोक्यात आली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

ही आग आटोक्यात आली असली तरी इथं धुराचं प्रमाण मोठं आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म 1 वरून गाड्या जाण्यास विलंब होत आहे. संध्याकाळी आग लागल्यानंतर तातडीने घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या 10 गाड्या रवाना झाल्या.

अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने ही आग नियंत्रणात आणली. अजूनही मदतकार्य सुरू असून मध्यरात्रीपर्यंत हे काम सुरू राहणार आहे. मात्र ही आग कशामुळे लागली हे अजून स्पष्ट होऊ शकलं नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 1, 2014 09:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close