S M L

पुण्यात विवाहित महिलेवर बलात्कार

Sachin Salve | Updated On: Nov 3, 2014 05:00 PM IST

Image img_233172_rape345234_240x180.jpg03 नोव्हेंबर : पुण्याजवळ वडकी इथं एका विवाहित महिलेवर बलात्काराची घटना घडलीये. रविवारी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींनी या महिलेच्या घरात घुसून हे कृत्य केलं. पीडित महिलेला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आल असून लोणी-काळभोर पोलीस स्टेशनमधे गुन्हा नोंद करण्यात आलाय.

पुणे सासवड रस्त्यावर हडपसरनंतर वडकी गाव आहे. पीडित महिला घरात एकटी होती. घराची वीज गेली होती. महिलेच्या दिराचं कुटुंब गावी गेल्याने ते घर बंद होतं. मात्र संध्याकाळी घर उघडं दिसल्याने पीडित महिलेन घरात डोकावून पाहिलं असता दोन व्यक्ती घरात दिसल्या. त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. चोरीच्या उद्देशाने हे दोघे घरात घुसले असावेत असं पोलिसांचं म्हणणं आहे. घटना घडली त्यावेळी भारनियमनामुळे वीज गेली होती. पीडित महिलेला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आल असून लोणी-काळभोर पोलीस स्टेशनमधे गुन्हा नोंद करण्यात आलाय. शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोर्‍हे यांनी आज पीडित महिलेची भेट घेतली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 3, 2014 02:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close