S M L

पुणेकरांचा पुन्हा हेल्मेट सक्तीविरोधात एल्गार

Sachin Salve | Updated On: Nov 15, 2014 09:05 PM IST

पुणेकरांचा पुन्हा हेल्मेट सक्तीविरोधात एल्गार

pune helmet15 नोव्हेंबर : पुण्यामध्ये पुन्हा एकदा जुन्या वादानं नव्यानं डोकंवर काढलंय. पुणे वाहतूक शाखेनं पुन्हा एकदा हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. हेल्मेट न घालणार्‍या दुचाकीस्वारांवर पुणे पोलीस सध्या कारवाई करत आहेत. पण पुणे ट्रॅफिक पोलिसांच्या या सक्तीविरोधात आता सूर उमटू लागलाय.

पुण्यात पुन्हा हेल्मेट सक्तीला सुरुवात झाल्यामुळे आता हेल्मेट विरोधी कृती समिती पुन्हा एकदा सक्रीय झाली आहे. हेल्मेटला आमचा विरोध नाही, पण हेल्मेटच्या सक्तीला आहे असं म्हणत हेल्मेट विरोधी कृती समिती सध्या आक्रमक झाली आहे. यापूर्वीही त्यांनी या विषयावरुन आंदोलन छेडलं होतं आणि आता पुन्हा एकदा त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. यापुर्वी पुण्यामध्ये जेव्हा हेल्मेट सक्ती झाली होती त्यावेळी या समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं. हेल्मेट नदीत बुडवणे, हेल्मेटची अंतयात्रा काढणे अशी अस्सल पुणेरी आंदोलन झाली होती. आता ही कृती समिती पुन्हा सक्रीय झाली आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा हेल्मेटविरोधी आंदोलन केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन याबाबतचं धोरण ठरवण्याची आपण मागणी करणार असल्याचं या आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय. तर हेल्मेट सक्ती ही न करता हा निर्णय नागरिकांवरच सोडला पाहिजे असं मत पुण्याचे महापौर दत्ता धनकवडे यांनी व्यक्त केलंय. पुण्यातील दुचाकीस्वारांचा वेग हा 30-40 एवढाच असतो. पण नागरिकांनी सुरक्षिततेचा विचार करावा असं म्हणत, काय करायचं ते नागरिकांनीच ठरवावं असं सांगून महापौरांनी हातवर केले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 15, 2014 09:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close