S M L

पीएमपीएलचं चाक रूतलं डबघाईत, पालिकेकडेच 100 कोटींची थकबाकी

Sachin Salve | Updated On: Nov 17, 2014 10:58 PM IST

पीएमपीएलचं चाक रूतलं डबघाईत, पालिकेकडेच 100 कोटींची थकबाकी

PMPL17 नोव्हेंबर : पुणे महानगर परिवहन लिमिटेड अर्थात पीएमपीएल (PMPL)नं तोटा कमी करण्यासाठी भाडेवाढ केली. पण पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेकडून पीएमपीएलला तब्बल 100 कोटींचं येणं आहे. त्यामुळे पीएमपीएलच्या पुढे मोठा आर्थिक पेच निर्माण झाल्या आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार पीएमपीएलचा तोटा 60:40 या प्रमाणात पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेनी उचलायचा आहे. दोन्ही पालिकांकडून एकूण येणं जवळपास 250 कोटी रुपये होते. त्यातले 150 कोटी रुपये पीएमपीएलकडे आले आहेत, पण अजूनही 100 कोटी रुपयांची थकबाकी आहेच. हे पैसे आले नाहीत तर पीएमपीएलवर मोठं आर्थिक संकट ओढावेल, असं पीएमपीएलच्या अधिकार्‍यांचं म्हणणं आहे. याबद्दल पुण्याचे उपमहापौर आबा बागुल यांना विचारलं, तेव्हा त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं. तर दुसरीकडे हा सगळा प्रकार ठेकेदारांच्या फायद्यासाठी सुरु असल्याचा आरोप कौंग्रेसचे नेते संजय बालगुडेंनी केला आहे.

पीएमपीएल आर्थिक स्थिती

- पुणे महानगरपालिकेकडून एकूण येणं - 66 कोटी रु.

- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून एकूण येणं - 34.5 कोटी रु.

- पीएमपीएलच्या ऑडिटनुसार 2013-14 या काळात 132 कोटी रुपयांचा तोटा

- पुणे महापालिकेच्या ऑडिटनुसार 2013-14 या काळात पीएमपीएलला 252 कोटींचा तोटा

- भाडेवाढीनंतर फक्त 9 कोटी रुपयांची तूट भरून निघणार

- महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडला 20 कोटी 73 लाख रुपयांचं देणं

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 17, 2014 08:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close