S M L

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौर्‍यावर

Samruddha Bhambure | Updated On: Nov 18, 2014 04:06 PM IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौर्‍यावर

18 नोव्हेंबर :  लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पाठ फिरवल्यानंतर मनसेने आता पुन्हा कामाला लागण्याचं ठरवलं आहे. पक्षांतर्गत कुरूबुरी सुरू असतानाच आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत मनोमीलनाचे संकेत दिल्यानंतर मनसेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुणे, पिंपरी-चिंचवड दौर्‍यावर आहेत.

या दौर्‍यादरम्यान राज ठाकरे पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मान्यवरांशी संवाद साधणार आहेत.

आजपासून 20 नोव्हेंबर दरम्यान राज ठाकरे पुण्यातल्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत तर 21 आणि 22 नोव्हेंबरला ते पिंपरी-चिंचवड परिसरातल्या कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकार्‍यांशी संवाद साधणार आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 18, 2014 08:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close