S M L

विद्यार्थिनीबरोबर अश्लील चाळे करणारा उपमुख्याध्यापक अटकेत

Sachin Salve | Updated On: Nov 19, 2014 10:01 PM IST

विद्यार्थिनीबरोबर अश्लील चाळे करणारा उपमुख्याध्यापक अटकेत

pune_school19 नोव्हेंबर : शिक्षक हा समाजाचा आरसा समजला जातो पण शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना पुण्यात घडलीये. पुण्यातल्या विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दितल्या एका शाळेतल्या विद्यार्थिनीबरोबर अश्लील चाळे करणार्‍या शाळेच्या उपमुख्याध्यापकाला पोलिसांनी अटक केलीये. सुरेश जॉन पॉल असं या उपमुख्याध्यापकाचं नाव आहे.

सुरेश जॉन पॉल हा गेल्या सात - आठ महिन्या पासून शाळेतल्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करत होता. पण भितीपोटी विद्यार्थिनी हा प्रकार कुणालाही सांगत नव्हत्या. पण हे प्रकार वाढल्यानंतर शाळेच्या परिसरात चर्चा सुरू झाली आणि त्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी शाळेतील विद्यार्थिनीकडे चौकशी केल्यानंतर हा सगळा प्रकरा उघडकीस आला. शाळेतील एक विद्यार्थिनीच्या पालकांच्या तक्रारी वरून अखेर सुरेश जानॅ पॉल विरोधात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 19, 2014 10:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close