S M L

साहित्य संमेलन म्हणजे नसती उठाठेव -नेमाडे

Sachin Salve | Updated On: Nov 28, 2014 01:21 PM IST

 साहित्य संमेलन म्हणजे नसती उठाठेव -नेमाडे

nemade3328 नोव्हेंबर : इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद करा, मुलांना मातृभाषेत स्वप्न पडायला हवीत असं रोखठोक मत ज्येष्ठ साहित्यिक कोसलाकार भालचंद्र नेमाडे व्यक्त केलंय. तसंच शहाणपणाला मर्यादा असते, पण मूर्खपणाला नसते अशी टीकाही नेमाडे यांनी संमेलनावर केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फोडलंय.

एकीकडे मराठी शाळा बंद पडत असून इंग्रंजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा कल वाढतोय. अशावेळी नेमांडेंनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद करण्याबद्दल धाडसी विधान केलंय. नेमाडे यांनी साहित्य संमेलनावरही तोफ डागलीय. साहित्य संमेलन भरवणं म्हणजे नसती उठाठेव आहे. शहाणपणाला मर्यादा असते, मूर्खपणाला नसते अशा शब्दांत त्यांनी संमेलनावर टीका केलीय. संमेलनासाठी राजकारण, उद्योजकांचा पैसा असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधलंय.

दरम्यान, नेमाडे यांच्या वक्तव्यावर अखिल भारतीय महामंडळाच्या अध्यक्ष माधवी वैद्य यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणतात, 'घुमान येथे होणार्‍या या संमेलनाचं सर्व स्तरातंून स्वागत होतंय. या बाबतीत लोकांना या संमेलनाला उत्सफूर्त प्रतिसाद दिलाय. हा मराठी भाषेचा उत्सव सर्वसामान्य लोकांना आवडतो आहे. अनेक वाचक त्याचा आनंद लुटत आहेत. यावर्षीच्या या संमेलनामध्ये श्रीसंत नामदेव यांच्या कार्याला उजाळा देण्याचा प्रयत्न होणार आहे, ही ऐतिहासिक गोष्ट होईल. यासाठी कोणी मदतीचा हात आम्हाला दिला तर ते घेण्यामध्ये आम्हाला वावगे वाटत नाही. याविषयी जर कोणाला अनुकूल-प्रतिकूल मते नसतील, तर तो त्यांचा वैयक्तिक भाग असेल आणि अधिकारीही. याविषयी काहीही बोलणे आवश्यक वाटत नाही. भालचंद्र नेमाडे अनेक वादग्रस्त विधाने करीत असतात. एकीकडे ते संमेलनाला विरोध दर्शवतात. पण बडोद्याच्या भाषा संमेलनात ामत्र उत्साहानं सहभागी होतात, ही गोष्टही लक्षणीय आहे.'

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 28, 2014 01:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close