S M L

माऊलींच्या मंदिराला धोका, संरक्षण भिंतीला गेले तडे

Sachin Salve | Updated On: Dec 11, 2014 06:26 PM IST

माऊलींच्या मंदिराला धोका, संरक्षण भिंतीला गेले तडे

aalandi_madir2311 डिसेंबर : आळंदीमध्ये सुरू असलेल्या विकासा कामांमुळे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिराला धोका निर्माण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मंदिराच्या संरक्षक भिंतीला तडे गेल्यामुळे भक्तांना नाराजी व्यक्त केलीये.

आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिराच्या मागील बाजूस रस्त्याचे काम सुरू आहे. भाविकांच्या दर्शनबारीसाठी सध्या मंदिर समितीतर्फे बांधकाम सुरू आहे. या बांधकामामुळे मुख्य मंदिराच्या संरक्षक भिंतीला तडे गेले आहेत. तसंच या बांधकामासाठी ज्ञानेश्वर माऊलींच्या आजोबांचा जुना वाडाही जमीनदोस्त केला गेला आहे. आजोळवाडा या नावानं ओळखली जाणारी वास्तू भक्तांचं श्रद्धास्थान आहे. तीच वास्तू पाडली गेल्यानं भक्तांमध्ये तीव्र संताप आहे. शिवाय या बांधकामात अनियमितता आढळल्यानं काम स्थगित करण्याची नोटीसही आळंदी नगरपालिकेनं दिलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 11, 2014 06:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close