S M L

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 'बर्निंग ट्रक'

Sachin Salve | Updated On: Dec 17, 2014 04:21 PM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 'बर्निंग ट्रक'

burning_truck16 डिसेंबर: मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणार्‍या ट्रकने रस्त्याच्या मधोमधच अचानक पेट घेतला. ट्रकनं पेट घेतल्यानंतर ट्रकचालकानं बाहेर उडी मारल्याने सुदैवाने दुर्घटनेत कुणीही जखमी झालं नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचेपर्यंत हा ट्रक जळून पूर्ण खाक झाला होता.

अचानक पेट घेतलेल्या ट्रकमुळे एक्स्प्रेस हायवेवर मुंबईकडून पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. ही घटना ओझर्डे गावाजवळ संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली. एसी गॅस सिलेंडर आणि कपडे घेऊन येणार्‍या ट्रकने अचानक पेट घेतला. ट्रकमध्ये कपडे असल्याने ही आग भडकली. त्यातल्या एसी गॅस सिलेंडरचे स्फोट होत असल्यानं या रस्त्यावरची वाहतूक थांबवण्यात आली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 16, 2014 11:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close