S M L

प्रभात चित्रपटगृहाचा आज शेवटचा दिवस !

Samruddha Bhambure | Updated On: Dec 25, 2014 01:42 PM IST

प्रभात चित्रपटगृहाचा आज शेवटचा दिवस !

 25 डिसेंबर : मराठी चित्रपटांचे माहेर घर समजले जाणारे पुण्यातील प्रभात चित्रपटगृहाचा आजचा (25 डिसेंबर 2014 ) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उद्यापसून हे चित्रपटगृह प्रेक्षकांच्या सेवेतून निवृत्त होणार आहे. मराठी चित्रपटांसाठी हक्काच घर असलेल्या प्रभात थिएटरचा आज शेवटचे खेळ आहे.

प्रभात फिल्म कंपनीने हे चित्रपटगृह 21 सप्टेंबर 1934 रोजी भाड्यावर घेतले होते. आज या कराराचा शेवटचा दिवस असल्याने प्रभात चित्रपटगृह मूळ मालक किबे यांच्याकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. प्रभात चित्रपटगृह सुरू झाल्यापासून येथे 1300 हून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. मराठी चित्रपटांशी असलेल अतूट नात, आज तूटणार आहे. मावळतीचा 'प्रभात' पाहणं अनेकांसाठी अवघड जाणार आहे.

प्रभात बंद होणार हे समजल्यावर अनेक चाहत्यांनी प्रभातच्या आठवणींना उजाळा दिला. तर, अनेकांनी प्रभात चित्रपट गृहात (ता.24 ) बुधवारी जावून चित्रपट बघता बघता चित्रपट गृहाच्या आठवणी आपल्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवण्याचा प्रयत्न केला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 25, 2014 01:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close