S M L

पुण्यात अफगाण लष्करी अधिकारी ८ महिन्यांपासून बेपत्ता

Sachin Salve | Updated On: Dec 31, 2014 04:14 PM IST

पुण्यात अफगाण लष्करी अधिकारी ८ महिन्यांपासून बेपत्ता

afgan_pune31 डिसेंबर : पुण्यातील आर्मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रशिक्षक म्हणून आलेला अफगाणिस्तानातल्या सैन्यातला लष्करी अधिकारी गेल्या आठ महिन्यांपासून गायब आहे. हादिम मोहम्मद सादिक असं बेपत्ता झालेल्या अधिकार्‍याचं नाव आहे. आयबी, रॉ, लष्करी गुप्तचर यंत्रणांकडून सादिकचा शोध घेतला जातोय.

पिंपरी चिंचवड जवळच्या दापोडित असलेल्या आर्मी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये गेल्या वर्षी तो प्रशिक्षणासाठी आला होता. अफगाण आणि भारतीय लष्करातील इंजिनीअर्ससाठी सादिक दुभाषक प्रशिक्षक म्हणून काम करायचा.

तो 3 महिन्यांनतंर अचानक बेपत्ता झाला. सादिक बेपत्ता असल्याच्या घटनेला आता 8 महिने उलटून गेले आहेत. तरीही त्याचा पत्ता लागला नाही. त्यामुळे पुणे पोलिसांनी त्याच्याविरोधात LOC म्हणजेच लुकआउट सर्कुलर जारी केलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 31, 2014 04:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close