S M L

दोन विभागांच्या वादात रखडले 'माळीण'चे पुनर्वसन

Samruddha Bhambure | Updated On: Jan 8, 2015 03:02 PM IST

दोन विभागांच्या वादात रखडले 'माळीण'चे पुनर्वसन

08 जानेवारी : पुणे जिल्ह्यात दरड कोसळून उद्‌ध्वस्त झालेल्या माळीण गावाचं पुनर्वसन रखडलं आहे. माळीणच्या कायमस्वरूपी पुनर्वसनास निधी देण्यावरून सध्या शासनाच्या मदत व पुनर्वसन विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्यामध्ये वाद सुरू आहे. माळीणच्या पुनर्वसनासाठी निधी नसल्याचं स्पष्टीकरण आदिवासी विकास विभागाने दिले आहे तर अंदाजपत्रकात निधीसाठी तरतूदच केली

नसल्याचे पुनर्वसन विभागाने म्हटले आहे.

आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर जुलै 2014ला काळाने झडप घातली. मुसळधार पावसाने डोंगराचा कडा कोसळून गावातील 44 घरे गाडली गेली, त्यात तब्बल 151 लोकांचा मृत्यू झाला. या भीषण दुर्घटनेनंतर शासनाकडून तातडीने मदत आणि पुनर्वसनाचे आश्वासन देण्यात आले होते. शासनाच्या पुनर्वसन विभागाने संपूर्ण पुनर्वसनाची तयारीही दर्शविली. मात्र हे गाव आदिवासी विभागातील आहे. त्यामुळे आमच्या विभागातर्फेच पुनर्वसन होईल, अशी घोषणा तत्कालीन आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी केली होती.

कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी 10 कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. त्यानुसार अंदाजपत्रकामध्ये तरतूद करणे आवश्यक होते. मात्र निवडणुकीची आचारसंहिता आणि नंतरच्या सत्तांतरामुळे ही तरतूद झालीच नाही. त्यामुळे आता प्रत्यक्ष पुनर्वसनाचे काम सुरू झाल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाला निधीच उपलब्ध झाला नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 8, 2015 10:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close