S M L

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना 1 कोटी 83 लाखांचा दंड

Samruddha Bhambure | Updated On: Jan 14, 2015 03:01 PM IST

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना 1 कोटी 83 लाखांचा दंड

14 जानेवारी :  पुण्यातील प्रसिद्ध धरण बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना अंमलबजावणी संचालनायलयाने 1 कोटी 83 लाखांचा दंड ठोठावला. फेमा कायद्याअंतर्गत अविनाश भोसलेंवर कारवाई करण्यात आली आहे.

अविनाश भोसले यांना 2007 साली फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली होती. त्यावेळी भोसले यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर रोकड आणि महागड्या परदेशी वस्तू सापडल्या होत्या. मात्र त्यावेळी त्यांची प्राथमिक चौकशी करून त्यांना लगेचच सोडून दिले होते. पण आता याच प्रकरणाच्या सविस्तर चौकशीनंतर ईडीने अविनाश भोसले यांना दंड ठोठावला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 14, 2015 02:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close