S M L

पुणे पालिकेचं बजेट सादर, कचराकोंडीसाठी 50 कोटींची तरतूद !

Sachin Salve | Updated On: Jan 14, 2015 05:49 PM IST

Image img_221112_punemuncipalcorporation45454_240x180.jpg14 जानेवारी : पुणे महापालिकेनं 2015 आणि 16 साठी स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प सादर केलाय. या चालू वर्षासाठी एकूण 3 हजार 997 कोटींचं बजेट सादर झालंय.

यामध्ये मिळकत करात 18 टक्क्यांची वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. पाणीपट्टीमध्येही टप्प्याटप्प्याने वाढ प्रस्तावित आहे.

महत्त्वाचं म्हणजे पुण्यातल्या कचराकोंडींवर उपाय म्हणून कचरा वॉर्डातच जिरवण्यासाठी 50 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

पुणे महापालिका बजेट

एकूण 3997 कोटींचं बजेट स्थायी समितीसमोर सादर

करांमध्ये प्रस्तावित वाढ

पाणीपट्टीत टप्प्याटप्प्यानं वाढ

मिळकत करात 18 टक्क्यांची वाढ प्रस्तावित

कचरा वॉर्डातच जिरवण्यासाठी प्रकल्प उभारायला 50 कोटींची तरतूद

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 14, 2015 05:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close