S M L

अखेर बकोरिया यांच्या बदलीला स्थगिती

Sachin Salve | Updated On: Jan 14, 2015 11:04 PM IST

अखेर बकोरिया यांच्या बदलीला स्थगिती

pune omprakash bakoria14 जानेवारी : पुणे महापालिकेचे कर्तव्यदक्ष अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरियांची बदली करण्यात आली होती पण या बदलीला आता स्थगिती देण्यात आली आहे. कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बकोरियांची बदली करण्यात आली होती. याबाबतची पूर्ण माहिती घेतली असून योग्य ती कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.

पुणे महापालिकेत ओमप्रकाश बकोरिया यांची नियुक्ती होऊन अजून एक वर्षही झालं नाही आणि तेच त्यांची बदली करण्यात आली. बकोरिया यांनी अतिरिक्त आयुक्त म्हणून कारभार हाती घेतला होता. बकोरियांनी पुण्यातील निकृष्ट दर्जाची कामं करणार्‍या ठेकेदारांविरुद्ध अहवाल दिला होता. तसंच नागरिकांच्या हितासाठी योजना राबवली होती. एवढंच नाहीतर नागरिकांच्या तक्रारी नोंदवून घेण्यासाठी थेट व्हॉट्स ऍपचा उपयोग केला होता. पुण्यात नेहमी भेडसावणार पार्किंगच्या प्रश्नी आरक्षित जागांचा गैरवापर करणार्‍यांवर कारवाई केली होती. त्यामुळे त्यांच्या या बदलीमागे राजकीय दबाव आहे का असा प्रश्नही विचारला जातोय. बकोरियांच्या बदलीला काही स्वयंसेवी संस्थांनी विरोध केलाय. आणि आंदोलनाचा इशाराही दिलाय. अखेरीस बकोरिया यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली. तसंच त्यांच्याकडे आता क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचा पदभारही सोपवण्यात आलाय. आता त्यांच्याकडे दोनही पदांचा कार्यभार राहणार आहे.  बकोरिया यांच्या बदलीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हस्तक्षेप केला. बकोरिया यांच्या बदलीची संपूर्ण माहिती घेतली असून कुणी दोषी आढळलं तर कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 14, 2015 11:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close