S M L

मॅक्डोनल्डस्‌मध्येच बसून बच्चेकंपनीने केली बर्गर फस्त !

Sachin Salve | Updated On: Jan 19, 2015 08:01 PM IST

मॅक्डोनल्डस्‌मध्येच बसून बच्चेकंपनीने केली बर्गर फस्त !

pune_mack_don19 जानेवारी : एक गरीब मुलगा मॅक्डोनल्डस्‌मध्ये फँटा घेण्यासाठी आला म्हणून त्याला बाहेर काढण्याचा उद्दामपणा मॅक्डोनल्डस्‌च्या कर्मचार्‍याने केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मॅक्डोनल्डसच्या अशा सेवेमुळे स्वाभिमान संघटना आणि भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्याच मॅक्डोनल्डस् आऊटलेटमध्ये गरीब मुलांना बर्गर पार्टी देऊन निषेध व्यक्त केलाय.

मागील आठवड्यात शाहीन आत्तारवाला यांनी एका गरीब मुलाला माणुसकीच्या नात्याने फँडा फ्लोट खरेदी करू देण्यासाठी मॅक्डोनल्डस् आऊटलेटमध्ये घेऊन गेल्या होत्या. रांगेत उभा असलेल्या या गरीब मुलाला पाहून कर्मचार्‍यांनी त्याला सरळ बाहेर काढलं. या प्रकारामुळे शाहीन आत्तारवाला यांनी नाराजी व्यक्त केली आणि फेसबुकवरून आंदोलनंही छेडलं. मॅक्डोनल्डसच्या अशा या सेवेमुळे तीव्र संताप व्यक्त केला गेला. याचाच एक भाग म्हणून पुण्यातील जंगली महाराज रोड वरच्या त्याच मॅक्डोनल्डस्‌च्या आऊटलेटमध्ये आज स्वाभिमान संघटना आणि भाजपतर्फे गरीब मुलांसाठी बर्गर पार्टीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी डेक्कन भागातल्या गरीब मुलांनी मनसोक्त बर्गर खाण्याचा आस्वाद घेतला. मॅक्डोनल्डस्‌ने गोर गरीब मुलांची माफी मागावी अशी मागणी स्वाभिमान संघटना आणि भाजप युवा मोर्चाने केलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 19, 2015 06:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close