S M L

आर के लक्ष्मण यांचा अल्पपरिचय

Sachin Salve | Updated On: Jan 26, 2015 08:32 PM IST

आर के लक्ष्मण यांचा अल्पपरिचय

26 जानेवारी : कॉमन मॅनच्या व्यथा मांडतानाच त्यावर मिश्कील टिप्पणी करत हसु फुलवणार्‍या रेघा आता उमटणार नाहीत. ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांचं आज वयाच्या 94 व्या वर्षी निधन झालं. या महान व्यंगचित्रकाराचा हा अल्पपरिचय....

- आर के लक्ष्मण म्हणजेच रसिपूरम कृष्णस्वामी लक्ष्मण

जन्म - 23 ऑक्टोबर 1924

- जन्मस्थान - मद्रास

- 'द कॅामन मॅन' या सुप्रसिद्ध व्यंगचित्राचे जनक

- मुंबईतील जे जे स्कुल ऑफ आर्टस या महाविद्यालयाने त्यांना प्रवेश नाकारल्यानंतरही उमेद सोडली नाही

- पदवी शिक्षण म्हैसूर विद्यापीठातून पूर्ण केले

- फ्रि प्रेस जर्नल मधून खर्‍या कारकीर्दीला सुरूवात

- राजकीय व्यंगचित्रकार म्हणून ओळख

- गेली पन्नास वर्षे 'टाइम्स ऑफ इंडिया 'च्या मुखपृष्ठावर त्यांचे व्यंगचित्र रोज झळकली

- सतत 54 वर्षे त्यांनी आपल्या कार्टून्सच्या माध्यमातून रसिकांची मने जिंकली

- त्यांच्या थोरले बंधू आर के नारायणन यांचा जगप्रसिद्ध कथा संग्रह ' मालगुडीडेज' च्या यशामध्ये लक्ष्मण यांचा मोलाचा वाटा होता

- त्यांचा एशियन पेन्टस्‌चा 'गट्टू' ही लोकांना भावला

- त्यांचे ' द कॉमन मॅन' हे त्या त्या काळातल्या सामाजिक व राजकीय परिस्थितीवर व्यंगात्मक टीका करण्याचे सदर होते

- हल्लीच त्यांच्या 'कॅामन मॅन' या व्यक्तिरेखेला लेखक अनिल जोगळेकर यांनी इंग्रजी रंगभूमीवर उतरविलं होतं

- 2003 मध्ये त्यांना पॅरालिसीसचा पहिला ऍटॅक

-'यू सेड इट' या शीर्षकाखाली कार्टून सीरिज प्रसिद्ध

-आत्मचरित्र- द टनेल ऑफ टाईम

- 'लक्ष्मणरेषा' नावानं मराठीत आत्मचरित्र प्रसिद्ध

लक्ष्मण यांना पुरस्कार

- भारत सरकारकडून पद्म विभूषण व पद्मभूषण

- पत्रकारीतेत व साहित्यातला जगातला सवोर्च्च पुरस्कार म्हणजेच रामन मॅगासेस पुरसकार

- एक्स्प्रेस ग्रुप कडून बि.डी गोएन्का पुरसकार

- हिंदुस्तान टाइम्सकडून दुर्गा रत्न सुवर्ण पदक

- सी एन एनकडून पत्रकारीतेतला जीवन गौरव पुरसकार

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 26, 2015 08:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close