S M L

आर. के. लक्ष्मण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Samruddha Bhambure | Updated On: Jan 27, 2015 03:18 PM IST

आर. के. लक्ष्मण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

27 जानेवारी : 'कॉमन मॅन'चे जनक आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

पोलीस दलाकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी वैकुंठ स्मशानभूमीत लक्ष्मण यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी लक्ष्मण यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य सरकार त्यांचे स्मारक उभारेल, अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

आर. के. लक्ष्मण यांचे सोमवारी संध्याकाळी पुण्यात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी संध्याकाळी सहा वाजून 50 मिनिटांनी रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. लक्ष्मण यांच्या निधन म्हणजे 'कॉमन मॅनने एक्झिट घेतली' अशी भावना त्यांच्या चाहत्यांमध्ये निर्माण झाली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 27, 2015 01:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close