S M L

आर.के.लक्ष्मण यांचं स्मारक उभारणार -मुख्यमंत्री

Sachin Salve | Updated On: Jan 27, 2015 06:16 PM IST

cm fadanvis27 जानेवारी : आर.के.लक्ष्मण हे देशाचे वैभव होते. त्यांच्या जाण्यामुळे मोठी पोकळी निर्माण झालीये. त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहाव्यात यासाठी राज्य सरकार लवकरच स्मारक उभारेल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

'कॉमन मॅनचे जनक ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचं सोमवारी निधन झालं. आज पुण्यात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आर.के.लक्ष्मण यांना अखेरचा निरोप दिला. आर.के.लक्ष्मण यांच्या जाण्यामुळे मोठी पोकळी निर्माण झालीये. ती न भरू येणारी आहे. त्यांनी साकारलेला कॉमनमॅन जगाच्या पाठीवर सदैव जिवंत राहिल. त्यांचा कॉमन मॅन हा राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेवर अंकुशाप्रमाणे भासत राहिल अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. तसंच आर.के. लक्ष्मण यांच्या आठवणी कायम स्मरणात राहाव्यात यासाठी राज्य सरकारडून स्मारक उभारलं जाईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 27, 2015 06:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close