S M L

इन्कम टॅक्सच्या नोटिसांमुळे साखर कारखाने दुहेरी संकटात-पवार

Sachin Salve | Updated On: Jan 29, 2015 05:25 PM IST

pawar_on_swabhimani29 जानेवारी : राज्यातील साखर कारखानदारी इन्कम टॅक्सच्या नोटीसांमुळे दुहेरी कात्रीत सापडली असून आता सरकारनेच मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी केलीये. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

एकीकडे एफआरपी पेक्षा जास्त भाव दिला म्हणून आयकर विभाग नोटीसा पाठवतोय तर दुसरीकडे एफआररपीचा दर मिळावा, यासाठी सरकारमधलेच पक्ष कारखान्यांविरोधात आंदोलन करत आहेत.

म्हणूनच या दुहेरी संकटातून मार्ग काढण्यासाठी आता सरकारनेच साखर उद्योगाला मदत करावी, अशी मागणी शरद पवारांनी केली.. पुण्यात आज साखर संघाच्या बैठक पवारांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली त्यात पवारांनी या उद्योगाच्या अडचणी माध्यमांसमोर मांडल्या.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 29, 2015 05:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close