S M L

सफाई कामगारावर डोळे गमावण्याची वेळ,पालिकेचं दुर्लक्ष

Sachin Salve | Updated On: Jan 30, 2015 05:04 PM IST

सफाई कामगारावर डोळे गमावण्याची वेळ,पालिकेचं दुर्लक्ष

pune_safai worker30 जानेवारी : कचरा वेचतांना केमिक्लच्या बाटलीचा स्फोट झाल्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या एका सफाई कामगाराला आपले डोळे गमावण्याची वेळ ओढावली आहे. येडबा झोंबाडे अस या सफाई कामगारचा नाव आहे. पुणे महापालिकेने कचरा वेचकांच्या सुरक्षेच्या निकक्षाकडे दुर्लक्ष केल्यामुळे येडबावर ही वेळे ओढावली आहे.

मागील एक महिन्यापासुन पुणे महापालिकेच्या सफाई कामगारांना खुल्या हाताने ओला-सुखा कचर्‍याच वर्गीकरण कराव लागतंय. सफाई कामगाराने खुल्या हाताने ओला-सुखा कचर्‍याचं वर्गीकरण करू नये असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असताना देखील पुणे महापालिका आपल्या सफाई कामगाराकडून खुल्या हाताने कचर्‍याच वर्गीकरण करण्यात येतंय. येडबा ओला-सुखा कचर्‍याच वर्गीकरण करत असताना कचर्‍यात असलेल्या एका केमिक्लच्या बाटलीचा स्फोट झाला. स्फोटात उडालेल्या फवार्‍यामुळे येडबाच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली. या दुर्घटनेमुळे येडबावर डोळे गमावण्याची शक्याता निर्माण झाली आहे. मात्र महापालिकेकडून या घटनेची साधी दखल देखील घेण्यात आली नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 30, 2015 05:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close