S M L

पुण्यातील ओवेसींच्या सभेला परवानगी नाकारली

Sachin Salve | Updated On: Feb 2, 2015 06:28 PM IST

Asaduddin Owaisi mim02 फेब्रुवारी : पुण्यात एमआयएमचे नेते असादुद्दीन ओवेसी यांच्या भाषणाला परवानगी नाकारण्यात आली आहे. मुस्लीम आरक्षण परिषदेमध्ये ओवेसी यांचं भाषण होणार होतं, पण या भाषणाला वानवाडी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पुण्यासह महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडू नये,आणि धार्मिक ऐक्याला धक्का लागू नये असं स्पष्ट करत पोलिसांनी परवानगी नाकारण्यात आली असं स्पष्ट केलं.

एमआयएम अर्थात मजलिस-ए इत्तहदुल मुस्लिमीन सघटनेनं महाराष्ट्रभर जाळ पसरवण्यासाठी धडपड सुरू केलीये. विधानसभा निवडणुकीत एमआयएमने आंध्रची सीमा ओलांडून आश्चर्यकारक विजय मिळवून आपली दखल घेण्यास भाग पाडलं. एमआयएमचे नेते असादुद्दीन ओवेसी यांचं पुण्यात मुस्लीम आरक्षण परिषदेमध्ये भाषण होणार होतं. मात्र, त्यांच्या सभेला शिवसेनेनं कडाडून विरोध केला. शिवसेनेचे नेते विनायक निम्हण यांनी ओवेसी यांची सभा उधळून लावू असा इशारा दिला होता. तसं पत्र त्यंानी पुण्याच्या आयुक्तांना पाठवलंय. येत्या 4 तारखेला ओवेसींची पुण्यात सभा होतेय. ओवेसी हे चिथावणीखोर भाषण करतात. त्यांच्यामुळे सामाजिक वातावरण बिघडतं. त्यामुळे पोलिसांनी काळजी घ्यावी आणि सभेलाच परवानगी देवू नये अशी मागणी निम्हण यांनी केली. तर, परवानगी नाकारली असली तरी परिषद होणारच असं निवृत्त न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी म्हटलं होतं. कोळसे पाटीलही या परिषदेत सहभागी होणार आहे. अखेर कायदा सुव्यवस्था, सामाजिक सलोखा बिघडू नये आणि धार्मिक ऐक्याला धक्का लागू नये असं स्पष्ट करत वानवाडी पोलिसांनी ओवेसींच्या सभेला परवानगी नाकारली. सभेला परवानगी नाकारल्यामुळे ओवेसींना झटका मानला जात आहे. मुस्लीम परिषदेच्या आयोजकांनी याबद्दल पोलिसांनाकडे कार्यक्रमाची माहिती पुरवली. पण पोलिसांनी सेनेचा विरोध आणि कायदा सुव्यवस्था लक्षात घेता सभेला परवानगी दिली नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 2, 2015 06:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close