S M L

पुण्यात ओवेसींचं भाषण, शिवसैनिकांची निदर्शनं

Sachin Salve | Updated On: Feb 4, 2015 06:58 PM IST

पुण्यात ओवेसींचं भाषण, शिवसैनिकांची निदर्शनं

पुणे (04 फेब्रुवारी ):  अखेर एमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवेसी यांचं भाषण मोठ्या तणावात पार पडलं. पण त्याअगोदर ओवेसींच्या भाषणावरून मोठा राडा झाला. आयोजकांनी पोलिसांना हमीपत्र दिल्यामुळे पोलिसांनी त्यांना भाषणाला परवानगी दिली. त्यामुळे संतप्त शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. कायदा सुव्यवस्था लक्षात घेता शेकडो शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

प्रक्षोभक भाषणामुळे वादग्रस्त ठरलेले एमआयएमचे नेते असादुद्दीन ओवेसी यांच्या सभेवरून पुण्यात तणाव निर्माण झाला होता. हिंदूंविरुद्ध ओवेसी बोलले, तर कार्यक्रम उधळून लावू, असा इशारा शिवसेनेने दिला होता त्यामुळे पोलिसांनी ओवेसींच्या सभेला परवानगी नाकारली होती. मात्र आज वेगळं नाट्य घडलं. दुपारी ओवेसी हे प्रक्षोभक भाषण करणार नाही असं हमीपत्र आयोजकांनी पोलिसांना दिलं. त्यानंतर पोलिसांनी ओवेसींच्या भाषणाला परवानगी दिली. मात्र, ओवेसींच्या सभेला परवानगी मिळाल्यामुळे शिवसैनिका आपला विरोध कायम ठेवला. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सहा वाजता पुण्यातल्या कौसरबागेत ओवेसींचं भाषण पार पडलं. या भाषणात त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. पण त्याअगोदर शिवसेना त्याविरोधात निदर्शनं केली. खबरदारीचा उपाय म्हणून ठिकठिकाणहून शिवसैनिकांना ताब्यात घेतलं जातंय. सकाळपासून जवळपास 350 शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आलंय. तणावपूर्ण वातावरणात ओवेसींचं भाषण संपलं खरं पण त्यामुळे पुणे पोलिसांना शिवसैनिक आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांत संघर्ष पेटू नये यासाठी मोठी खबरदारी घ्यावी लागली. पुण्यात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. अजूनही पुण्यातील वातावरण निव्वळलं नाही. मात्र, ओवेसींचं भाषण सुरळीत पार पडल्यामुळे पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडलाय. दरम्यान, नागपूरमध्ये 28 फेब्रुवारीला ओवेसींची सभा आयोजित करण्यात आलीये. या सभेलाही शिवसेनेचा विरोध आहे. ओवेसींना नागपूरमध्ये पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेनं घेतलीय.

या अटीवर झालं ओवेसींचं भाषण

1 . कार्यक्रम वेळेत सुरू करावा.

2. संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रम संपवावा.

3. आमंत्रित व्यक्तींपैकी कुणीही जातीय, धार्मिक, भाषिक तेढ निर्माण होतील अशी भाषण करू नये.

4. धार्मिक , भाषिक तेढ निर्माण होतील अशा घोषणा देऊ नये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 4, 2015 06:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close