S M L

मुंबई-पुणे प्रवास आणखी सुसाट, एक्स्प्रेस वे होणार 8 लेनचा !

Sachin Salve | Updated On: Feb 5, 2015 07:11 PM IST

मुंबई-पुणे प्रवास आणखी सुसाट, एक्स्प्रेस वे होणार 8 लेनचा !

05 फेब्रुवारी : मुंबई आणि पुणे या दोन मेट्रो शहरांना जोडणारा मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेचा प्रवास आता आणखी सुकर होणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेचा विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. केवळ विस्तारच नाही तर या प्रवासाचा वेळ अर्ध्या तासानं कमी होणार आहे. त्याचबरोबर एक्स्प्रेस वे आता 8 लेनचा होणार आहे. दोन्ही बाजूला एकेक लेन वाढवण्यात येणार आहे.

युती सरकारच्या काळात महत्वाकांक्षी असा मुंबई-पुणे हायवे साकारण्यात आलाय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यासाठी खास आग्रही होते. त्यावेळी तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन ग़डकरी यांनी यासाठी पुढाकार घेऊन एक्स्प्रेस वे उभारण्यात आला. मात्र, अलीकडे एक्स्प्रेस वे वाहतुकीची कोंडी आणि अपघाताचे प्रमाण वाढले. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स्प्रेस वेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी काही उपाययोजना स्पष्ट केल्यात. लोणावळा घाटातला प्रवास टाळण्यासाठी खालापूर टोलनाकाच्या पुढे 4 किलोमीटर अंतरावरून सिंहगड संस्थेपर्यंत 12 किलोमीटरचा लोणावळा बायपास एक्सप्रेस वे बांधण्यात येणार आहे. या रस्त्यावर 8 किलोमीटरचा बोगदा बनवण्यात येणार आहे. त्याचबरोबर 2 केबल स्टे ब्रीजही बांधण्यात येणार आहे. हा बायपास लोणावळा गावाच्या खालून सह्याद्री पर्वताच्या आतून जाणार आहे. हा रस्ता लोणावळा सरोवराच्या तळाखालून 180 मी खालून हा बायपास बोगदा जाणार आहे. तसंच लोणावळा बायपास एक्स्प्रेस वे आता 8 लेनचा होणार आहे. दोन्ही बाजूला एकेक लेन वाढवण्यात येणार आहे. नव्यानं तयार होणार्‍या या बायपास रोडवर कोणताही टोल लावला जाणार नाही. हा विस्तारीत प्रकल्प पुर्ण झाल्यावर मुंबई-पुणे एक्सप्रेस वे 14 लेनचा होईल. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे च्या या विस्तारीत प्रकल्पासाठी 7000 कोटी खर्च अपेक्षीत आहे.

 कसा होणार एक्स्प्रेस वेचा विस्तार ?

1) मुंबई-पुणे एक्प्रेस वे वर होणारी कोंडी दूर करण्यासाठी खालापूर ते लोणावळा टनेल.

2) एक्प्रेस वे आणि जुना राष्ट्रीय महामार्ग क्र 4 विस्तारीकरण योजना

3) यामध्ये एक एक लेन वाढवणार

4) एक्प्रेस वे वरील अपघातग्रस्तांना तातडीनं मदत देण्यासाठी एअर अँम्बुलन्स आणि ट्रामा केअर सेंटर या सुविधा सुरू करणार

5) ओझर्डे इथ ट्रामा केअर सेंटर

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 5, 2015 07:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close