S M L

रंगकर्मी हरपला, ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे कालवश

Samruddha Bhambure | Updated On: Feb 7, 2015 03:49 PM IST

रंगकर्मी हरपला, ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे कालवश

07  फेब्रुवारी :  ज्येष्ठ नाट्यकर्मी आत्माराम भेंडे यांचं पुण्यातील रत्ना हॉस्पिटलमध्ये निधन झालं. वयाच्या 93 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली.

गेल्या सहा दशकांहून अधिककाळ मराठी रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता म्हणून आत्माराम भेंडे कार्यरत होते. भेंडे यांनी इंडियन नॅशनल थिएटरमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. विनोदी अभिनेते आणि लेखक बबन प्रभू यांच्याबरोबर त्यांनी केलेली अनेक दर्जेदार विनोदी, फार्सिकल नाटकं गाजली. 'पळा पळा; कोण पुढे पळे तो', दिनूच्या सासूबाई राधाबाई, झोपी गेलेला जागा झाला, पिलूचं लग्नं आशी अनेक नाटकं त्यांनी गाजवली.

मराठी रंगभूमीप्रमाणेच हिंदी, इंग्रजी रंगभूमीवरही त्यांनी ठसा उमटवला. अनेक दूरदर्शन मालिकाही त्यांनी दिग्दर्शित केल्या आहेत. त्याचप्रमाणे भेंडे यांच्या अनेक जाहिरातीही गाजल्या. हिंदीत 'लगे रहो मुन्नाभाई' या सिनेमातली त्यांची भूमिकाही लोकप्रिय ठरली होती. आत्माराम भेंडे नाट्यसंमेलनाचे माजी अध्यक्षही होते.

आत्माराम भेंडे यांना आतापर्यंत नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, नाटय़दर्पण, शंकरराव घाणेकर, नाट्यभूषण, चिंतामणराव कोल्हटकर, नटसम्राट नानासाहेब फाटक तसेच 2006-07 साली महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्य सांस्कृतिक राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 7, 2015 09:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close