S M L

राज्यात स्वाईन फ्लू आता पूर्णपणे नियंत्रणाखाली -सावंत

Sachin Salve | Updated On: Feb 27, 2015 12:17 PM IST

राज्यात स्वाईन फ्लू आता पूर्णपणे नियंत्रणाखाली -सावंत

27 फेब्रुवारी : राज्यातला स्वाईन फ्लू आता पूर्णपणे नियंत्रणाखाली असल्याचा दावा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केलाय. नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि सरकारला सहकार्य करावं असं आवाहनही सावंत यांनी केलं. स्वाईन फ्लूवरच्या ऑसेलटॅमीवीर या औषधाचा राज्यात पुरेसा साठा आहे असंही सावंत यांनी सांगितलंय. ते पिंपरी-चिंचवडमध्ये बोलत होते.

या वेळी ऑसेलटॅमीवीर या औषधाचा राज्यात तुटवडा निर्माण झाला असल्याच्या वृत्ताचा आरोग्यमंत्र्यांनी इन्कार केला. मात्र पत्रकारांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांची त्यांना समाधानकारक उत्तरं देता आली नाहीत. राज्यात स्वाईन फ्लूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा त्यांनी यावेळी आढावा सादर केला. देशातील अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात स्वाईन फ्लूची परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचा सांगत नागरिकांनी घाबरून न जाता, स्वाईन फ्लूचा प्रसार होऊ नये यासाठी शासनाला सहकार्य करावं, असं आवाहनही सावंत यांनी केलंय. सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची एकूण संख्या 1,352 झाली असून आजपर्यंत एकूण 119 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील नऊ रुग्ण हे परराज्यातून आलेले होते. सध्या राज्यात स्वाईन फ्लूचे एकूण 406 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून त्यापैकी 54 जण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती डॉ. सावंत यांनी दिली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 27, 2015 12:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close