S M L

आंबेघरजवळ कार नदीत कोसळून एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: Mar 11, 2015 01:10 PM IST

आंबेघरजवळ कार नदीत कोसळून एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

11 मार्च : महाड-भोर रस्त्यावर पुण्याच्या दिशेने येणारी एक अल्टो कार मंगळवारी मध्यरात्री निरा नदी पात्रात कोसळली. या दुर्घटनेत दोन महिला, दोन पुरुष आणि एक लहान मुलगा असा पाच जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

अपघातातील सर्व मृत चिंचवडचे रहिवासी असून, एकाच कुटुंबातील आहेत. भोसले कुटुंब महाडहून पुण्याच्या दिशेने येत असताना मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि कार पुलाचा कठडा तोडून नदी पात्रात कोसळली.

नदीमध्ये मोठया प्रमाणावर पाणी असल्याने पाचही जणांचा बुडून मृत्यू झाला. प्रविण भोसले (22), दत्ताराम भोसले (52), लिलाबाई भोसले (48), रिध्दी भोसले (22) आणि शौर्य भोसले (दीडवर्ष) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 11, 2015 12:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close