S M L

पुण्यात पीएमपीएल बसला अपघात, 2 ठार

Samruddha Bhambure | Updated On: Mar 16, 2015 05:33 PM IST

पुण्यात पीएमपीएल बसला अपघात, 2 ठार

pmpl416 मार्च : पुण्यातील कात्रज डेपो परिसरात आज दुपारी 2 च्या सुमारास पीएमपीएलच्या बसला अपघात झाला. या अपघातात दोन प्रवासी ठार झाले असून  तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना रेड्डी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

कात्रजहून ही बस निगडीच्या दिशेने निघाली होती. बसच्या चाकामध्ये हवा कमी असल्यामुळे बसचालकाला ब्रेक लावता आला नाही. दरम्यान कोणती बस आहे हे पाहण्यासाठी एक महिला आणि पुरुष या बसच्या समोर आले.

ब्रेक न लागल्यामुळे या बसची या दोघांना धडक बसली. आणि ते दोघे जागीच मृत्युमुखी पडले. मृत्युमुखी पडलेले दोघे हे नातेवाईक असल्याचं कळतंय. घटनास्थळी उभे असलेले आणखी तीन जणही जखमी झाले आहेत. जखमींवर रेड्डी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2015 03:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close