S M L

दादांची पुन्हा टगेगिरी, 'काकडेंना निवडणुकीत उभा आडवा करतो'

Sachin Salve | Updated On: Mar 16, 2015 08:01 PM IST

ajit pawar ncpe16 मार्च : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पुन्हा एकदा आपल्या दादागिरीमुळे चर्चेत आले. सोमेश्वर साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत शहाजीराव काकडे यांनी निवडणुकीत त्यांच्या 3 पिढ्या आठवतील, असा उभा आडवा करतो असं वादग्रस्त विधान अजित पवार यांनी केलं.

पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीला आता रंगत वाढू लागलीय. सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांनी यावेळी अजित पवारांची साथ सोडली आहे. या पूर्वी अजित पवारांनी काकडेंवर 3 कोटी 33 लाख रूपयांच्या तथाकथित घोटाळ्यांचा आरोप केला होता. त्याला काकडेंनी राज्यामध्ये सर्वाधिक घोटाळेबाज कोण आहे हे राज्यातील सर्व जनता ओळखून आहे असं प्रत्युत्तर दिलं होतं. संचालक मंडळाच्या निवडणुकीत काकडेंची साथ मिळत नाही. म्हटल्यावर अजित पवारही बिथरले आहे आणि त्यांनी काकडेंना या निवडणुकीत त्यांच्या 3 पिढ्या आठवतील, असा उभा आडवा करतो असं वादग्रस्त विधान विधानं केली आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2015 08:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close