S M L

पुण्यात चोरीला गेलेली 'पीएमपीएमएल' बस नाशिकमध्ये सापडली

Samruddha Bhambure | Updated On: Mar 19, 2015 11:38 AM IST

पुण्यात चोरीला गेलेली 'पीएमपीएमएल' बस नाशिकमध्ये सापडली

19 मार्च : पुण्यातून चोरीला गेलेली 'पीएमपीएमएल'ची बस नाशिकयेथे सापडली असून, बसचा ताबा घेण्यासाठी मार्केट यार्ड पोलिसांचे पथक नाशिकला रवाना झाले आहे.

पीएमपी चालकाने मंगळवारी रात्री मार्केट यार्ड गेट नं. 9च्या डाव्या बाजुला बस उभी केली होती. एका अज्ञात चोरट्याने ही बस मध्यरात्री चोरून नेली. त्यानंतर सुरेश शंकर सोनवणे (वय-50. रा, गुरूवार पेठ, पुणे) यांनी यासंदर्भात मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, चोरीला गेलेली बस नाशिकजवळच्या शिंदे गावात सापडली आहे. मात्र, चोरटा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. बस ताब्यात घेण्यासाठी मार्केट यार्ड पोलिसांची एक टीम नाशिकला रवाना झाले असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस चोरटयाचा शोध घेत आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 19, 2015 11:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close