S M L

धक्कादायक, नववीचे विद्यार्थी तपासतायत 10 वीचे पेपर !

Sachin Salve | Updated On: Mar 21, 2015 03:30 PM IST

 धक्कादायक, नववीचे विद्यार्थी तपासतायत 10 वीचे पेपर !

21 मार्च : पुण्यातील विमानगर भागात आनंद विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये दहावी बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासण्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय. दहावी बोर्डाच्या उत्तरपत्रिका चक्क नववीचे विद्यार्थी तपासत असल्याचा पुरावा आयबीएन-लोकमतच्या हाती लागलाय.

आनंद विद्या निकेतन हायस्कूल येथे दशरथ बेलेकर नावाचे हिंदी विषयाचे शिक्षक आहेत. बेलेकर हे आपल्या शाळेतील नववी वर्गाच्या विद्यार्थिनींच्या मदतीनं दहावीच्या उत्तरपत्रिका तपासत असल्याचं दिसतंय. बेलेकर हे शिक्षक चक्क विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळत आहेत. नववी वर्गातील विद्यार्थी कसे काय दहावी वर्गाचे प्रश्न पत्रिका तपासू शकतात ? प्रश्न पत्रिका तपासण्यासाठी विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा अधिकार या शिक्षकाला कुणी दिला ? असा प्रश्न पडतोय. आता या शिक्षकावर शिक्षणाधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2015 03:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close